महाराष्ट्राच्या सीमेवरील राज्ये | States bordering Maharashtra | महाराष्ट्र शेजारील राज्य(१) वायव्येस गुजरात राज्य, तसेच दादरा व नगर हवेली हा संघराज्य प्रदेश; उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस व काहीशा ईशान्येस छत्तीसगढ़, दक्षिणेस गोवा व कर्नाटक, आग्नेयेस तेलंगाणा.

(२) नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांच्या सीमारेषा कर्नाटक राज्याशी संलग्र आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमारेषा गोवा या राज्याशीही संलग्न आहे.

(३) गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, जळगाव, बुलढाणा, धुळे व नंदुरबार या आठ जिल्ह्यांच्या सीमारेषा मध्य प्रदेश राज्याशी सामाईक आहेत.

(४) गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगढ़ या राज्यास जाऊन मिळाल्या आहेत. (५) राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ व नांदेड या चार जिल्ह्यांच्या सीमारेषा तेलंगाणा या राज्यास भिडल्या आहेत. (६) धुळे, नंदुरबार, नाशिक व पालघर या चार जिल्ह्यांच्या सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहेत.

Post a Comment