MPSC State Service Pre Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य सेवा परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा : एकूण पदे 09
मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद : 22 पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी : 28 पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क : 02 पदे
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क : 03 पदे
कक्ष अधिकारी : 05 पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी : 04 पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य : 88 पदे
Post a Comment