Geographical features of India: आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे.

प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण ‘प्राचीन भारत’ असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इ.स. १९४७ पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात.

१. हिमालय

२. सिंधु-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश

३. थरचे वाळवंट

४. दख्खनचे पठार

५. समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश

६. समुद्रातील बेटे


Post a Comment