Arogya Vibhag Bharti 2021: आरोग्य विभागातील ‘या’ परीक्षांचे निकाल रोखले – परीक्षा पुन्हा होणार – राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभागातील ‘क’ व ‘ड’ संवर्गातील पदे येत्या दोन महिन्यात भरणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

Aarogya Vibhag Bharti 2021 Details – सार्वजनिक आरोग्य विभागातील अ, ब, क आणि ड विभागातील १८ हजार ३९७ पदे रिक्त आहेत. जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत तडजोड करून चालणार नाही, असे सांगताना राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील पदे येत्या २ महिन्यात भरण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान दिले.

आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गातील सर्वच्या सर्व पदे थेट भरतीच्या माध्यमातून भरली जाणार असून ‘क’ संवर्गातील ५० टक्के पदे भरली जाणार आहेत.तर मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर उर्वरित पदे भरली जाणार असल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. या संदर्भातील पुढील अपडेट लवकरच प्रकाशित करू.


आमचा Whatsaap ग्रुप जॉईन करण्यासाठीं इथे क्लिक करा.

अधिक माहितीसाठी : https://mahabharti.in/arogya-vibhag-bharti-2021/

Post a Comment